विना चालक चार्जिंग पॉईंटवर जाणारी फ्यूचर कार

mini
मिनी कंपनी सध्या परफेक्ट प्रिमियम कॉम्पॅक्ट कार उत्पादक म्हणून जगात प्रसिद्धी मिळवत असतानाच त्यांनी त्यांच्या फ्यूचर कारची घोषणा केली आहे. ही विनाचालक कार अतिशय स्मार्ट असेल शिवाय दिसायला आणि कामालाही आकर्षक असेल असा कंपनीचा दावा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ज्या कारवर सध्या कंपनीत काम सुरू आहे ती विनाचालक चार्जिंग पॉईंटवर जाऊ शकते व पॅसेजरला पिकअपही करू शकते. ही सेल्फ ड्रीव्हन कार अॅडव्हान्स डिजिटलायझेशनमुळे भविष्यात कार क्षेत्रावर अधिराज्य गाजवेल असेही सांगितले जात आहे. ही कार कस्टमाईज्ड असेलच शिवाय २४/७ उपलब्ध असेल. यात चालकाला त्याच्या मर्जीनुसार निर्णय घेता येणार आहे. म्हणजे त्याला स्वतःला कार चालवायची असेल तर ती चालविता येईल अथवा ऑटोमेशनवर टाकता येईल. तसेच कारचे स्टीअरिंग व्हील डावीकडे अथवा उजवीकडे कुठेही शिफ्ट करता येईल.

या कारच्या सीटस एकदमच वेगळ्या स्टाईलच्या असतीलच पण इंटिरिअरही पॅसेंजरच्या मूडनुसार बदलता येईल. त्याला ब्लॅक कॅनव्हस असे नांव दिले गेले आहे. ही कार स्वतःच क्लिनिंग सेंटरवर जाऊन स्वच्छही होणार आहे.

Leave a Comment