राजनना आणखी दोन टर्म द्याव्यात- नारायण मूर्ती

murti
रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांना मुदतवाढ दिली जावी यासाठी कार्पोरेट जगतातून मोठे समर्थन दिले जात असतानाच भारतीतील दोन नंबरची आय टी कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी राजन यांना एकच नाही तर आणखी दोन टर्म दिल्या जाव्यात असे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले राजन यांनी गर्व्हनर म्हणून फारच चांगली कामगिरी बजावलेली आहे आणि भारताची अर्थव्यवस्था रूळावर आणायची असेल तर त्यासाठी राजन यांना मुदतवाढ दिली गेली पाहिजे. राजन यांच्यासारखा गर्व्हनर मिळणे हे भारतासाठी भाग्यशाली असल्याचेही ते म्हणाले.

नारायण मूर्तींनी मोदी सरकारचेही तोंड भरून कौतुक केले. ते म्हणाले हे सरकार फारच उत्तम काम करते आहे. राजन यांना सरकारातील कांही व्यक्तींकडूनच विरोध होतो आहे मात्र त्यांचे अर्थक्षेत्रातील काम व अनुभव पाहता त्यांना एकदाच नव्हे तर दोन वेळा मुदतवाढ दिली गेली पाहिजे.

राजन यांना मुदतवाढ दिली जावी का या संदर्भात मे महिन्यात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात कार्पोरेट जगतातील ९० टक्के सीईओंनी राजन यांचे समर्थन केले आहे.

Leave a Comment