टाटा स्कायची शैक्षणिक सेवा सुरू

tata-sky
मुंबई : टाटा क्लासएजच्या (शाळांना तंत्रज्ञानाधारित शैक्षणिक सेवा पुरविणारी आघाडीची पुरवठादार कंपनी) सहकार्याने टाटा स्काय क्लासरूम ही शैक्षणिक सेवा डीटीएच उद्योगांमध्ये अनेक अभिनय सेवा आणणा-या टाटा स्कायने सुरू केली आहे. ही एक संवादी सेवा असून, गणित आणि विज्ञानातील संकल्पनांचा अध्ययनांचे अध्ययन अतिशय रोचक पद्धतीने सुलभ करण्याच्या उद्देशाने ती सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा विशेष म्हणजे, एखाद्याला अगदी घरबसल्या हे शिक्षण घेता येणार आहे.

टाटा स्कायच्या सर्व ग्राहकांना ही संवादी सेवा उपलब्ध आहे. धडय़ांची रचना शिक्षणक्रमानुसार केलेली असल्याने, इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना ती अभ्यासात मदत करणारी ठरेल. विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणितातील मूलभूत संकल्पना स्पष्ट होण्यासाठी या सेवेचा उपयोग होणार असून, एनिमेशन व्हिडिओ आशयाद्वारे विद्यार्थ्यांना खिळवून ठेवून शिकवण्यावर यात भर असेल.

टाटा स्कायच्या मुख्य वाणिज्य अधिकारी पल्लवी पुरी या सेवेच्या उद्घाटनाप्रसंगी म्हणाल्या, भविष्यातील अभ्यासाचा पाया पक्का होण्यासाठी मुलांना मूलभूत संकल्पनांची स्पष्टता येणे ही सध्याची गरज आहे. या मूलभूत संकल्पना समजून घेऊन त्याद्वारे शाळेतील कामगिरी सुधारण्यासाठी टाटा स्काय क्लासरूम या सेवेचा लाभ होईल. ही सेवा मुलांच्या शालेय शिक्षणक्रमांशी सुसंगत असून, यामध्ये 500 हून अधिक धडे रोचक आणि संवादी पद्धतीने शिकता येतील. ग्राहक बारामुल्लामधील असो, वा बेंगळूरमधील, अंतिमतः याद्वारे दूरचित्रवाणी शिक्षणासाठी उपयोग करणे शक्य होणार आहे.

Leave a Comment