शिक्षकांचे मूल्यमापन करणार विद्यार्थी

cochin
कोची – आपल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन अद्याप तरी शिक्षकच करत होते. पण शैक्षणिक वर्षातील शिक्षकांचे मूल्यमापन करण्यासाठी कोचीमधील एका विद्यापीठाने विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा अनोखा निर्णय घेतला असून दरम्यान या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी शिक्षकांच्या संघटनेने विरोध दर्शविल्याने करण्यात आलेली आहे.

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वार्षिक कामिगरीचे मूल्यमापन करण्याची संधी कोचीमधील कोची विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने (कोची युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजी-कुसात) विद्यार्थ्यांनाच दिली आहे. विद्यार्थ्यांकडून शिक्षकांची वर्गातील कामगिरी, नियमित वर्ग, अभ्यासक्रमाची वेळेत पूर्तता, विषय शिकविताना प्रभावी संवादकौशल्य, विद्यार्थ्यांच्या शंकांचे केलेले समाधान आदी बाबींचा समावेश असणार आहे.सत्र पद्धतीमध्ये (सेमिस्टर) विद्यार्थीच शिक्षकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणार आहेत, अशी माहिती कुलगुरू जे. लेथा यांनी दिली. शिक्षकांच्या एकूण कामगिरीपैकी ३० टक्के हे विद्यार्थ्यांनी केलेल्या मूल्यमापनावर आधारित असल्याचेही त्यांनी सांगितले.