शस्त्रक्रियेनंतर युवतीचा रक्तगटच बदलला

Blood
सिडनी: शरीरातील रक्त हा एक असा घटक आहे; की त्याच्यात किरकोळ बदल होण्याच्या शक्यताही खूपच दुर्मीळ असतात. मात्र ऑस्ट्रेलियातील एका युवतीवर ‘लिव्हर’ बदलण्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिच्या शरीराने लिव्हर देणाऱ्याचा रक्तगटदेखील स्वीकारला आहे. त्यामुळे तिचा शस्त्रक्रियेपूर्वीचा ओ पॉझीटीव्ह रक्तगट बदलून ओ निगेटिव्ह झाला आहे. वैद्यकशास्त्रातील ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे.

डेमी या युवतीला वयाच्या १५ वर्षापासून लिव्हरचा विकार होता. लिव्हर बदलण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करून लिव्हर बदलण्यात आली. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर ९ महिन्यात डेमीची प्रकृती अत्यंत ढासळल्याने तिची तपासणी करण्यात आली असता तिचा रक्तगट बदलल्याचे आढळून आले. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार सामान्यपणे शरीराची यंत्रणा बाहेरचा कोणताही घटक सहसाहाजी स्वीकारत नाही. त्यामुळे अवयव बदलाची शस्त्रक्रिया करताना रुग्ण आणि अवयव दाता यांचा रक्तगट जुळत नसल्यास रुग्णाला दीर्घकाळ ‘अँटी रिजेक्शन’ औषधे घेण्याची आवश्यकता पडते. मात्र डेमीच्या शरीराने लिव्हर दात्याचा रक्तगटच आपलासा केल्याने तिला या औषधांची गरज पडली नाही.

अशा प्रकारे दुसऱ्याचा रक्तगट स्वीकारण्याचा प्रकार तब्बल ६ कोटी लोकांमध्ये एखाद्याच्या बाबतीत शक्य होतो. डेमी ही अशी अत्यंत दुर्मीळ व्यक्ती बनली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *