OMG! लष्कराचा जवान मृत्यूनंतर सात वर्षांनी घरी परतला

army
डेहराडून – चक्क सात वर्षांनी लष्कराने मृत जाहीर केलेला एक जवान घरी परतला असून या जवानाचे धरमवीर सिंग असे नाव आहे. २००९ साली धरमवीर सिंग यांचा एक अपघात झाला होता. नियमाप्रमाणे तीन वर्षांनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. मात्र, आता सात वर्षांनंतर धरमवीर हे सुखरुप आपल्या घरी परतले आहेत.

२००९ साली धरमवीर सिंग हे अचानक बेपत्ता झाले होते. सात वर्षांपूर्वी त्यांच्या मोटारीला चकारता येथे अपघात झाला होता. यावेळी त्यांच्यासोबत अन्य दोन सहकारी होते. अपघातानंतर लष्कराने त्यांना मृत घोषित केले होते. मात्र, त्यांचा मृतदेह आढळून आला नव्हता. सिंग यांची अपघातानंतर स्मृती हरवली होती. यानंतर ते हरिद्वारमधील रस्त्यांवर भटकत होते. रस्त्यावर भटक असताना एका दुचाकीचालकाने त्यांना उडविले. त्यांना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना त्यांचा भुतकाळ आठविण्यास सुरुवात झाली.

लष्कराने धरमवीर यांचे मृत्यूपत्र जारी करून त्यांच्या कुटुंबीयांना निवृत्तिवेतन सुरू केले होते. धरमवीर यांचा मृतदेह आढळला नसल्याने त्यांच्यासंदर्भात काय झाले आहे हे कुटुंबियांना कळत नव्हते. अपघातानंतर धरमवीर यांना दुचाकीस्वाराने काही पैसे दिले. या पैशातून दिल्लीचे तिकीट काढले. यानंतर ते घरी पोहचले. धरमवीर यांना पाहून घरच्यांना आश्चार्याचा धक्काच बसला. कुटुंबीयांना ओळखणे अवघड झाले होते.

Leave a Comment