शाओमीचा ३ जीबी रॅम आणि जबरदस्त बॅटरी बॅकअपवाला नवा फोन लाँच

xaiomi
मुंबई – अल्पावधीत स्मार्टफोनच्या जगात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या चीनच्या शाओमी कंपनीने आपला रेड मी ३ सिरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच केला असून रेड मी 3एस नावाचा हा फोन आजपासूनच चिनी बाजारात उपलब्ध झाला आहे. शाओमीच्या ऑनलाईन स्टोअर Mi.com वरुन युजर्स या फोनची खरेदी करु शकतात. पण हा फोन भारतात कधी दाखल होईल यासंदर्भात कंपनीने आणखी काहीही सांगितले नाही.

कंपनीच्या म्हणण्यानुसार रेड मी ३ चे हे लेटेस्ट वर्जन आहे. यामध्ये प्रोसेसर आणि फिंगरप्रिंट सेंसर आहे. शिओमी रेड मी३ मध्ये हे फिचर्स नाहीत. दोन प्रकारात हा फोन उपलब्ध असून १६ जीबी मेमरी आणि २ जीबी रॅमच्या फोनची किंमत CNY 699 (७ हजार) आहे. तर ३२ जीबी मेमरी आणि ३ जीबी रॅमची किंमत CNY 899 (९ हजार) रुपये आहे. याच्या बॅटरीची क्षमता ४१०० mAh एवढी आहे, पण ती किती तासांचा बॅकअप देते याबाबत कंपनीने सांगितले नाही. फोनच्या पाठीमागील पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. या फोनचा डिस्प्ले ५ इंच असून रेजोल्यूशन क्वालिटी ७२०x१२८० एवढी आहे. यात स्नॅपड्रॅगन ४३० ऑक्टाकोरचा प्रोसेसर असून १.१GHz च्या स्पीडने काम करते. यात १३ मेगा पिक्सेलचा रिअर कॅमेरा तर ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये एफ २.० अपर्चर, ऑटोफोकस आणि एचडीआर मोड आहे. तसेच फुल्ल एचडी क्वॉलिटी व्हिडिओ रेकार्ड करता येते. हा फोन ४ जी नेटवर्क सपोर्ट करतो. तसेच वाय-फाय, जीपीआरएस, ब्ल्यूटूथ, जीपीएस आणि मायक्रो युएसबीसारखे फिचर्सही आहेत.

Leave a Comment