माझांतीची जबरदस्त इव्हेंट्रा सुपरकार

mazzanti
इटालियन कार उत्पादनात असलेल्या माझांती कंपनीचे नांव कदाचित कांही जणांना माहितीही नसेल. मात्र या कंपनीने अलिकडच्या काळात जबरदस्त कार बनवून आपला ठसा या क्षेत्रावर उमटविला आहे. त्यांनी त्यांची तब्बल १ हजार हॉर्सपॉवर क्षमतेची इव्हेंट्रा मिलेकॅव्हीली ही सुपरकार नुकतीच ऑटो शेा मध्ये सादर केली आहे. या कारची फक्त २५ युनिट बनविली जाणार आहेत.

या कारसाठी ७.२ लिटरचे ट्विन टर्बो व्ही ८ इंजिन बसविले गेले आहे. त्याला सिक्स स्पीड सिक्वेन्शियल ट्रान्समिशनची जोड दिली गेली आहे. ही कार ० ते १०० किमीचा वेग फक्त २.८ सेकंदात घेते आणि तिचा टॉप स्पीड आहे ताशी ४०२ किमी. या गाडीचे खास वैशिष्ठ आहेत ते तिचे ब्रेक्स. या कारसाठी कार्बन सिरॅमिकपासून बनविलेले ब्रेक्स आहेत त्यामुळे ही कार ३०० किमीच्या वेगाने जात असली तरी ती केवळ ७ सेकंदात पूर्णपणे थांबू शकते. इटालीतील ही सर्वात ताकदवान कार असल्याचा कंपनीचा दावा आहे. ही कार वजनाला हलकी आहे. तिचे वजन आहे १३०० किलो.

Leave a Comment