५ सहयोगी बँकांचे स्टेट बँकेत विलिनीकरण

state-bank-of-india
नवी दिल्ली: ५ सहयोगी बँकांचे देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण होणार असून या विलीनीकरणाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पतियाळा, स्टेट बँक ऑफ मैसूर आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद यांच्यासह अवघ्या तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या भारतीय महिला बँकेचंही स्टेट बँकेमध्ये विलिनीकरण होणार आहे.

सदर विलीनीकरणास कॅबिनेटने तत्वतः मंजुरी दिल्यानंतर आता बँकांच्या विलिनीकरणाचे धोरण लवकरच निश्चित होईल, अशी माहिती दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. केंद्राच्या या निर्णयामुळे स्टेट बँक आणि विलीनकरण होणाऱ्या बँकांचा मोठा फायदा होणार असल्याचे मत अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment