दिल्लीतील कॅनॉट प्लेस सर्वात महाग

connaught
नवी दिल्ली – कार्यालय थाटण्यासाठी देशातील सर्वात महाग कार्यालय ठिकाण म्हणून दिल्लीमधील कॅनॉट प्लेस हे बनले आहे. जगातील सातव्या क्रमाकांचे हे महागडे स्थळ असल्याची माहिती संपत्ती सल्लागार कंपनी सीबीआरई रिसर्चच्या द्धिवार्षिक सर्वेक्षणामध्ये समोर आली आहे. मुंबईमधील बांद्रा कुर्ला परिसराला १९ वे आणि नरीमन पॉईंटला ३४ वे स्थान या यादीमध्ये मिळाले आहे. नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्ये जर कार्यालय थाटायचे असेल तर एका वर्षाचे भाडे १०,०६७ रुपये म्हणजेच १४९.७१ डॉलर प्रति चौरस फूट आहे.