गिरच्या अभयारण्यात यंदाच्या वर्षात सिंहाच्या संख्येत किमान २०० पिलांची भर पडणार असल्याचे वनविभागाने सांगितले आहे. वन संरक्षण विभागातील अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा १०० सिंहीणी पिलांना जन्म देणार आहेत. त्यातील ६५ सिंहीणींची प्रसूती व्यवस्थित होईल असे धरले तरी पिलांची संख्या चांगलीच वाढणार आहे. एक सिंहीण एकावेळी किमान २ छाव्यांना जन्म देते. कधीकधी ही संख्या ३ ते ४ छाव्यांपर्यतही असते.
गीर जंगलात एकाचवेळी १०० सिंहीणी गर्भिणी
गीर अभयारण्य मुख्यत्वे सिहांसाठीच असून सिंहाच्या शिकारीवर बंदी आल्यानंतर येथे झपाट्याने सिंहांची संख्या वाढत चालली आहे. कांही वर्षांपूर्वी येथे अवघे १० ते १२ सिंह उरले होते. मे २०१५ मध्ये केलेल्या शेवटच्या गणनेनुसार येथे आज घडीला १०९ नर, २०१ माद्या व २१३ पिले होती. या संख्येत आता २०० पिलांची भर पडणार आहे.