जपानमधील पहिल्या नग्न रेस्टॉरंटमध्ये लठ्ठ व्यक्तींना नाही प्रवेश

restaurant
लंडन: जर तुम्ही जास्तच वजनदार आहात आणि त्यात तुम्ही अंगावर टॅटूने गोंदून घेतले असेल तर तुम्हाला नग्न भोजनाचा आनंद घेता येणार नाही. अशा जाड्या व्यक्तींना जपानमध्ये सुरु होणा-या पहिल्या नग्न रेस्टॉरंट ‘अमृता’ मध्ये प्रवेश नाही.

लवकरच एक नग्न रेस्टॉरंट जपानमध्ये सुरू होत असून या रेस्टॉरंटमध्ये अ‍ॅडम अँड ईव्ह-स्टाईल बँक्वेट असणार आहे. मात्र या हॉटेलमध्ये प्रवेश हवा असल्यास त्यासाठी काही काटेकोर नियम असणार आहे. तुम्ही कसे दिसता यासंदर्भातील हे नियम आहेत. या रेस्टॉरंटचे नाव अमृता असे असून येत्या २९ जुलैला टोकियोमध्ये या रेस्टॉरंटचे उद्घाटन होईल. या अनोख्या रेस्टॉरंटमध्ये येण्यासाठी जपानमधील काही हौशी खवय्यांनी उत्सुकता दर्शवली आहे. या हॉटेलमध्ये प्रवेशासाठी ९० ते ५२० पौंड एवढी किंमत मोजावी लागणार आहे. यामध्ये खाद्यपदार्थ आणि नृत्याच्या कार्यक्रमाच्या आस्वादाचा समावेश आहे. हे हॉटेल सुरू होण्यापूर्वीच उद्घाटनासह इतर अनेक दिवसांचे बुकींग आधीच झाले आहे.

या हॉटेलच्या नियमात ठळकपणे म्हटले आहे, की उंचीच्या तुलनेत जर १५ किलो अधिकचे वजन असेल तर बुकींग करु नका. इंग्लंडमध्ये अशाप्रकारच्या हॉटेलमध्ये विचित्र अनुभव आल्याने वरिल अट घालण्यात आली असल्याचे रेस्टॉरंट संचालकांचे मत आहे. सुंदर रोमन पेंटीग्जने हॉटेल सजवण्यात येणार आहे. या हॉटेलमध्ये कुणालाही स्पर्ष करण्यासही मनाई असणार आहे. तसे टॅटू काढलेल्या ग्राहकांनाही या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश असणार नाही. मोबाईल फोनही आत घेऊन जाता येणार नाही.प्रवेशासाठी वयोमर्यादाही आहे. केवळ १८ ते ६० या वयोगटातील लोकच या रेस्टॉरंटचा लाभ घेऊ शकतील. लंडन आणि मेलबोर्नमधील अशा हॉटेलमध्ये आणि अमृतामध्ये एकच फरक असणार आहे, तो म्हणजे येथे येणा-या ग्राहकास लज्जा रक्षणासाठी कागदापासून तयार केलेले हलके वस्त्र देण्यात येईल.

Leave a Comment