२८ जूनपासून मिळणार ‘फ्रिडम’

freedom
नवी दिल्ली: जगातला सर्वात स्वस्त फोन म्हणून चर्चेत आलेल्या ‘फ्रिडम २५१’ या बहुचर्चीत स्मार्टफोनचे ज्यांनी बुकींग केले होते त्यांना या फोनचे २८ जूनपासून वितरण करण्यात येणार असल्याची माहिती रिगिंग बेल्स कंपनीने दिली आहे.

जगातला सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याने या फोनचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी ग्राहकांनी एकच गोंधळ केला होता. पण या कंपनीने अनेक कथित वाद समोर आल्याने या कंपनीला मोठा फटकाही बसला. आता कंपनी त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन असलेल्या ३० हजार ग्राहकांना हा फोन देणार आहे. त्या ग्राहकांना २८ जूनपासून स्मार्टफोनचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे संचालक मोहित गोयल यांनी दिली.

या फोनबद्द्ल अनेकांना जगातला सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याने उत्सुकता होती. तब्बल ७ कोटी ग्राहकांनी या फोनसाठी रजिस्ट्रेशन केले होते. केवळ २५१ रूपयात हा स्मार्टफोन मिळत असल्याने याला ग्राहकांनी मोठी पसंती दिली होती. पण अनेक वादांमुळे हा फोन चर्चेतही आला होता. आता अखेर या फोनचे वितरण करण्यात येणार असून हा फोन कसा आहे हे लवकरच कळेल.

Leave a Comment