नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचे पाद्यपूजन संपन्न

lalbaugcha-raja1
मुंबई – मंगळवारी भक्तिमय वातावरणात महाराष्ट्रासह देशविदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडला. ही पूजा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी सपत्निक केली. दर्शनासाठी आलेल्या शेकडो भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ असा एकच जयघोष केला. यावेळी मानद सचिव सुधीर साळवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

नवसाला पावणारा म्हणून लालबागचा राजा हा प्रचलित असल्यामुळे दरवर्षी अनेक भाविक लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आतुर असतात. त्यामुळे काल पाद्यपूजन झाल्यानंतर आता भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी आस लावून बसले आहेत.
lalbaugcha-raja

Leave a Comment