जॉर्डनकडून फायटर जेट घेणार पाकिस्तान

fighter
अमेरिकेने एफ १६ फायटर जेट खरेदीसाठी पाकिस्तानला देण्यात येणारे ४५०० कोटींचे अनुदान न देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर पाकिस्तानने अमेरिकेकडून विमाने खरेदी करण्यात येणार नसल्याचे घोषित केले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज चौधरी यांनी पाकिस्तान जॉर्डनकडून फायटर जेट खरेदी करेल असे सांगताना पाकिस्तानची चीनशी होत असलेली जवळीक पाहूनच अमेरिकेने अनुदान न देण्याची घोषणा केल्याचे मान्य केले आहे.

पाकिस्तान आणि चीनमधील मैत्री पाक अमेरिकेतील तणावास कारणीभूत ठरल्याचे मान्य करून ते म्हणाले अमेरिकेने आमच्यासोबत ८ एफ १६ फायटर जेट खरेदीचा करार फेब्रुवारीत केला होता. ७०० दशलक्ष डॉलर्सच्या या करारात अमेरिका ४५०० कोटींचे अनुदान देणार होती. मात्र त्यांनी हे अनुदान न देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही फायटर जेटची खरेदी अमेरिकेकडून न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे अमेरिका आणि पाकिस्तानमधील या करारावर भारताने नाराजी व्यक्त केली होती.

Leave a Comment