केपलर स्पेस टेलिस्कोपने घेतला दोन सूर्यांभोवती फिरणा-या ग्रहाचा शोध

keplar
वॉशिंग्टन: अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने एकाचवेळी दोन सूर्यांभोवती फिरणा-या महाकाय ग्रहाचा शोध लागला असल्याचे घोषित केले असून ही माहिती नासाने केपलर स्पेस टेलिस्कोपच्या साहाय्याने मिळवली असल्याचे सांगितले.

या ग्रहाचे नाव ‘केपलर १६४७ बी’ असे असून हा ग्रह सायग्नस या नक्षत्रामध्ये आहे. हा ग्रह पृथ्वीपासून ३,७०० प्रकाश वर्षे दूर असून त्याचे वय पृथ्वी इतकेच म्हणजे ४.४ अब्ज वर्षे असावे असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. केपलर १६४७ बी हा महाकाय ग्रह आहे. त्याचे चंद्र देखील विशाल असतील असा एक अंदाज आहे. जर त्याचे चंद्र मोठे असतील तर तेथे जीवसृष्टी राहू शकेल. ज्या ता-यांभोवती हा ग्रह प्रदक्षिणा मारतो त्यापैकी एक तारा हा सूर्यापेक्षा मोठा आहे तर दुसरा किंचीत छोटा आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे स्टार वार्स या प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटात दोन सूर्यांभोवती फिरणा-या ग्रहाचा संदर्भ आहे. या चित्रपटात अशा ग्रहांना टॅटूइन असे म्हटले आहे. इंग्रजीत या ग्रहांना सर्कमबायनरी प्लानेटस म्हणतात. या ग्रहाला सूर्याभोवती फेरी पूर्ण करण्यास १,१०७ दिवस किंवा तीन वर्षे लागतात.

Leave a Comment