अखेर वनप्लस ३ लॉन्च

oneplus
मुंबई: चीनची स्मार्टफोन निर्मिती करणा-या कंपनीने वनप्लसचे नवीन व्हर्जन लॉन्च केले असून या स्मार्टफोनचे नाव वनप्लस ३ असे आहे. अनेक नव्या गोष्टी या स्मार्टफोनमध्ये देण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवे फिचर्सही देण्यात आले आहेत. हा हँडसेट भारतात अॅमेझॉन कंपनीच्या साइटवर उपलब्ध होणार असून रात्री १२.३० वाजतापासून हा स्मार्टफोन या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.

या कंपनीने या नव्या स्मार्टफोनला आधीच बाजारात असलेल्या स्मार्टफोनसोबत टक्कर देण्यासाठी अधिक आकर्षक बनवण्याकडे लक्ष दिले असून स्मार्टफोन वापरणा-या ग्राहकांना फोनमध्ये कॅमेरा चांगला हवा असतो. त्यामुळे या फोनमध्ये कॅमेराकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. या फोनची किंमत किती असेल यावरून अनेकांना प्रश्न पडले आहेत. पण एका वृत्तपत्रात दिलेल्या जाहीरातीनुसार या फोनची किंमत २७ हजार ९९९ देण्यात आली आहे.

या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाचा फुल एचडी डिसप्ले आणि स्नैपड्रॅगन ८२० एसओसी प्रोसेसर आहे. १६ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा सेंसर आहे आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे वन प्लस ३ एंड्रॉयडमध्ये ६.०१ मार्शमेलो आधारित ऑक्सिझन ऑपरेटिंग सिस्टमपेक्षा कमी आहे या फोनमध्ये ३६५० एमएएचची बॅटरी असून त्यासोबत फास्ट चार्जिंग होण्याचे ऑपशन देखील आहे. सॅमसंग आणि आयफोन प्रमाणे या फोनमध्येही फिंगरप्रिंट सेंसर आहे. कंपनीने चीनमध्ये या हेंडसेटला १००० यूनिट फ्लॅश सेल करण्याचे वेगवेगळे पर्याय सांगितले. तिथे त्याची किंमत २,९९९ चीनी युआन प्रमाणे आहे.

Leave a Comment