५० टक्के मुलांचे भवितव्य पॉर्नोग्राफीच्या काटेरी विळख्यात

porn1
न्यूयॉर्क- माहिती आणि तंत्रज्ञान युगामुळे ११ वर्षांपासूनच लहान मुले पॉर्नोग्राफीच्या आहारी जात असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. वयाची १४ वर्षे उलटत नाहीत तोपर्यंत आपण पॉर्नोग्राफी पाहिली असल्याची कबुली ९४ टक्के मुलांनी दिली आहे. मोबाईल फोन्स, कम्प्युटर आणि डीव्हीडी द्वारे मुलांपर्यंत पॉर्नोग्राफी पोहचली असल्याचे संशोधनात म्हटले आहे. मिडलसेक्स विद्यापीठाच्या संशोधकांनी १००१ किशोरवयीन मुलांच्या मुलाखती घेऊन हे निष्कर्ष काढले आहेत.

पॉर्नोग्राफी ११-१२ वर्षांच्या २५ टक्के मुलांनी पाहिलेली असते. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ११ ते १६ या वयोगटातील मुलांना असे वाटते की पॉर्नोग्राफी म्हणजे खरे सेक्स असते. वास्तविक पॉर्नोग्राफी हा व्यवसाय असल्यामुळे त्यामध्ये काम करणारे लोक हे व्यावसायिक असतात आणि त्यांना याची किंमत चुकवावी लागते याची कल्पना या मुलांना नसते.

१३-१४ वयोगटातील ३९ टक्के मुला-मुलींना पॉर्नोग्राफीमध्ये पाहिलेली दृश्ये वास्तविक आयुष्यात करुन पाहावी असे वाटते. पॉर्नोग्राफीचे अनुकरण करुन किशोरवयीन मुलांनी आपल्या गर्लफ्रेंडसोबत सेक्स करताना मारहाण केल्याची अनेक उदाहरणे सापडली आहेत.