स्पर्मदान करा आणि मिळवा आयफोन!

sperm
बीजिंग – चीनमधील तरुणांना सरकारने वाढत असलेली ज्येष्ठांची संख्या आणि काम करणाऱ्या लोकांची कमी होत असलेल्या संख्येमुळे वीर्यदान (स्पर्म डोनेट) करण्याचे आवाहन केले आहे.

चीनमधील स्पर्म बँकांना अलिकडेच वीर्याची कमतरता जाणवत असून काही राजकीय आणि सांस्कृतिक कारणे त्यामागे असण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. काही पुरुष स्वयंप्रेरणेने स्पर्मदान करत होते. मात्र एका संशोधनातून स्वयंप्रेरणेने स्पर्मदान करण्याऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान सरकार देशातील तरुण लोकसंख्या वाढावी यासाठी विविध उपाययोजना राबवित येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून चीनमधील तरुणांना स्पर्मदानाचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी एका व्हिडिओ गेममधील पात्राद्वारे तरुणांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. तसेच तब्बल १ हजार डॉलर्सपर्यंत रोख रक्कम किंवा एक आयफोन अशी प्रोत्साहनपर बक्षिसेही देण्यात येत असल्याचे वृत्त आहे. चीनमधील एका सरकारी न्युज पोर्टलवर तुमची दया दाखवा अशा आशयाच्या एका लेखातून याबाबतचे आवाहन करण्यात आले होते. याशिवाय अलिकडेच एका वीर्य बँकेने केलेल्या जाहिरातीत वीर्यदान आणि रक्तदान या सारख्याच गोष्टी असल्याचे सांगण्यात आले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment