लेनोवोचा मनगटी स्मार्टफोन लॉंच

lenovo1
नवी दिल्ली : भविष्यातील तंत्रज्ञानाची स्मार्टफोनच्या दुनियेतील चीनी टेक्नॉलॉजी कंपनी लेनोवोने झलक दाखवत जगातला पहिला फ्लेक्सिबल प्रोटोटाईप सीप्ल्स स्मार्टफोन आणि फोलिया टॅबलेट लॉंच केले आहेत. तुम्ही हा स्मार्टफोन कसाही वाकवू शकता. तसेच, या स्मार्टफोनला वाकवून तुम्ही घड्याळाप्रमाणे मनगटातही अडकवू शकता.

दरम्यान, आपल्या उत्पादनाबाबत माहिती देताना लेनोवोने म्हटले आहे की, या फोनवर सध्या अधिक काम सुरू असून टेक वर्ल्ड २०१६ मध्ये लेनोवोने आपल्या फोल्डेबल डिवाईस सोबतच इतरही उत्पादने लॉंच केली आहेत. यात मोटो जेड आणि मोटो जेड फोर्स स्मार्टफोनही सहभागी आहे. शिवाय कंज्यूमर रेडी पोजेक्ट टॅंगो हॅडसेट, लेनोवो फॅब-२ प्रोहीचाही समावेश आहे.

सनफ्रांन्सीस्को येथे आयोजित केलेल्या या इव्हेंटमध्ये लेनोवोने फोल्डेबल टेक्नॉलॉजीची प्रयोग करत एक असा स्मार्टफोन लॉंच केला की, ज्यामुळे तेथे उपस्थित अवाक झाले. हा मोबाईल इतका लवचीक आहे की, तो वाकवून आपण मनगटातही अडकवू शकता. अशा पद्धतीचा हा पहिलाच स्मार्टफोन आहे. दरम्यान, लेनोवो तंत्रज्ञानाची कमाल दाखवत एक टॅबलेटही लॉंच केला आहे. हा टॅबलेट मधेच दुमडून कानालाही लावता येऊ शकतो. अर्थातच हा टॅबलेट फोनसारखा वापरता येऊ शकतो. दरम्यान, आपल्या उत्पादनांसंबंधी लेनोवो अधिक माहित दिली नाही.

Leave a Comment