लिंक्डिन कॉर्प झाली मायक्रोसॉफ्टची

microsfot
नवी दि‍ल्‍ली: जगातली सर्वात मोठी सोशल नेटवर्कींग साईट लिंक्डिन कॉर्प मायक्रोसॉफ्टने विकत घेतली असून ही कंपनी २,६२० कोटी डॉलर(१.७६ लाख कोटी)मध्ये मायक्रोसॉफ्टने विकत घेतली आहे. आतापर्यंत ही सर्वात मोठी डिल मानली जाते असून आता या दोन कंपन्या एकत्र येऊन प्रोफेशनल्ससाठी जगातले सर्वात मोठे ऑनलाईन नेटवर्क उभे करणार आहेत.

लिंक्डिनने जाहीर केलेल्या माहितीत सांगितले की, ही डिल या दोन कंपन्यांमध्ये झाली असून त्यानुसार मायक्रोसॉफ्ट कंपनी लिंक्डिनला १९६ डॉलर प्रति शेअरनुसार पेमेंट करेल. जेफ विनर लिंकडिन हे चीफ एक्झिक्यूटीव्ह ऑफिसर असतील आणि ते मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांना रिपोर्ट करतील. सीईओ सत्या नडेल यांच्या माध्यमातून ही डिल झाली असून २०११ मध्ये लिंक्डिन पब्लिक लिस्टींग झाल्यानंतर मायक्रोसॉफ्टने लिंक्डिन विकत घेण्यासाठी कित्येकवेळा पुढाकार घेतला होता. यावर्षाच्या शेवटपर्यंत ही सर्व रक्कम दिली जाणार आहे.

Leave a Comment