भारतात लॉन्च झाले मर्सिडिजच्या ए-क्लास कारचे स्पोर्ट्स व्हर्जन

mercedez
नवी दिल्ली: भारतात जर्मनीची लग्जरी कार कंपनी मर्सिडिजने त्यांच्या नव्या कारचे तीन व्हर्जन लॉन्च केले असून ए-क्लास, जीएलए आणि सीएलए या कार्सचे विशेष व्हर्जन लॉन्च करण्यात आले आहेत. मुंबईतील या कार्सची किंमत २५.९५ लाख रुपये ते ३५.२६ लाख रूपये एवढी आहे.

भारतात कंपनीने हे लॉन्चींग युरो कप २०१६च्या सुरू होण्याच्या निमित्ताने केले आहे. मर्सिडिज-बेंज इंडियाचे मुख्य कार्यकारी रोनाल्ड फॉल्गर यांनी सांगितले की, ए-क्लास, सीएलए आणि जीएलए यांचे व्हर्जन यूरो २०१६ चा आनंद साजरा करण्यासाठी लॉन्च करण्यात आले आहेत. ते म्हणाले की, या स्पोर्ट व्हर्जनच्या कार तरूणांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आल्या आहेत. ज्यांना स्पोर्टमध्ये इंटरेस्ट आहे. त्यांच्या लाईफस्टाईलच्या हिशोबाने या कार्सचे डिझाईन करण्यात आले आहेत.

१० जुलैपर्यंतच या कार्सचे स्पोर्टस एडिशन खास लोकांसोबत उपलब्ध असणार आहे. स्पोर्ट एडिशन ए१८० ची एक्स शो रूम किंमत २५.९५ लाख रूपये इतकी आहे तर ए२००डी मॉडलची किंमत २६.९५ लाख इतकी आहे. तर सीएलए २००ची किंमत ३३.२४ लाख आणि जीएलए २००ची किंमत ३४.२३ लाख रूपये इतकी आहे.

Leave a Comment