‘ओला मनी’ची ई-बे, येपमी, आस्कमी बाझारबरोबर भागिदारी

ola-money
मुंबई – ई-बे, येपमी आणि आस्कमी बाझार यांसारख्या अग्रणी ऑनलाइन ई-कॉमर्स कंपन्यांबरोबर ‘ओला मनी’ या कंपनीकडून भागिदारी जाहीर करण्यात आली. ग्राहकांना याद्वारे त्यांचा ओला मनी वॉलेटमधून एका क्लिकच्या साहाय्याने देयके देता येणार आहेत. तसेच ई-बेवर ओला मनीच्या सहाय्याने दिलेल्या देयकांवर २१ जूनपर्यंत अतिरिक्त १० टक्क्यांची सुटही मिळणार आहे. ग्राहकांना वेबसाइट आणि अॅपच्या माध्यमांतून देयक भरताना ओला मनीचा पर्याय निवडायचा आहे. अॅपवर एका क्लिकच्या साहाय्याने निवड केल्यावर चेक आऊटचा येईल आणि वेबवरून देयक देताना अधिकृततेसाठी मोबाइलवर ओटीपी येईल.

या व्यासपीठावरील देशातील लाखो ग्राहकांसाठी ओला मनी हे सर्वसाधारण आकाराचे सर्वात लोकप्रिय मोबाईल वॉलेट आहे. ओला मनी हे एक डिजिटल देयकांचा उत्तम पर्याय असून, ग्राहक जास्तीत जास्त उपयोग आणि रिचार्जसाठी वापर करतात. ओला मनी ओला व्यासपीठाच्या बाहेरही ग्राहकांना अमर्यादित, अनेक प्रकारातील वन टच चेक आउटचे सुरक्षित वातावरण देते.

Leave a Comment