ओलाची लक्स कॅब सेवा

olalux
मुंबई – अॅप टॅक्सीसेवा देणार्या ओला कंपनीने त्यांची लक्स सेवा दिल्ली, एनसीआर आणि मुंबई शहरात सुरू केली आहे. यामध्ये ग्राहकांना अत्याधुनिक सेदान, एसयूव्ही गाड्यातून प्रवासाची संधी मिळणार आहे. ग्राहक जग्वार, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, कॅम्री, होंडा अकॉर्ड , फॉर्च्युनर यासारख्या आलिशान गाड्यातून स्वस्त दरात प्रवास करू शकणार आहेत. यासाठी ग्राहकाला किमान २०० रूपये व त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी १९ रूपये दराने पैसे भरावे लागतील तसेच २ रूपये प्रतिनिमिट दराने राईड चार्जही द्यावा लागेल.

ओलाचे भारतातील मार्केटिंग प्रमुख राघुवेश स्वरूप म्हणाले, ग्राहकाला या सेवेमुळे पार्किंग साठी जागा शोधणे व वाहतूक कोंडीतून कार चालविणे या दिव्यातून सुटका मिळेलच शिवाय त्यांना मस्त, स्टायलिश आणि आरामदायी प्रवासाचा अनुभवही घेता येईल. सध्या ही सेवा दिल्ली-एनसीआर आणि मुंबईत सुरू केली जात आहे.या शहरातील ग्राहकांना त्यांच्या ओला अॅपवर लक्सचा आयकॉन दिसू शकणार आहे.

Leave a Comment