लेनोव्होचा ‘वाइब के५’ स्मार्टफोन लाँच

lenovo
मुंबई: भारतात लेनोव्होने आपला ‘वाइब के ५’ हा स्मार्टफोन लाँच केला असून याआधीच हा स्मार्टफोन युरोपमध्ये लाँच करण्यात आला होता.

लिनोव्होच्या ‘वाइब के ५ प्लस’प्रमाणेच ‘वाइब के ५’चा लूक असून फोनमध्ये पाच इंचाचा डिस्पले असून याचे रिझॉल्यूशन १२८०x७२० पिक्सल आहे. फोनमध्ये १.४GHz क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४१५ ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. या फोनचे इतर फिचर्स ‘वाइब के ५ प्लस’सारखेच आहेत. फोनमध्ये २ जीबीची रॅम देण्यात आली आहे. तसेच २७५० mAh ची रिमूव्हेबल बॅटरी देण्यात आली आहे. ‘वाइब के ५’ मध्ये १६जीबीची एक्सटरनल एक्सपांडेबल मेमरी देण्यात आली आहे. तसेच या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रन्ट आणि १३ मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा असून त्याला सोबत एलइडी फ्लॉश लाईटचीदेखील सुविधा उपल्बध करून देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन गोल्ड आणि सिलव्हर कलरमध्ये सध्या बाजारात उपलब्ध आहे. या सिरीजमधील ए६००० या स्मार्टफोनची किंमत ६९९९ रुपये एवढी आहे. तर के ५ प्लसची ८४९९ एवढी किंमत आहे.

Leave a Comment