भारतीय इंजिनिअरने बनवली ६ गिअर, १ हजार सीसी, तब्बल नऊ फूट लांब बाईक

bike
एका भारतीय इंजिनियरने एक, दोन नव्हे तर ७ वर्षे अथक मेहनत करत तब्बल ९ फूटांची बाईक बनवली असून या बाईकचे फिचर्सही इतर बाईक पेक्ष हटके असून, ही बाईक बघताचक्षणी सर्वांचे लक्ष वेधून घेते. ही बाईक सध्या बघायला लोकांची गर्दी होत असून विशेष म्हणजे ही बाईक कोणा आंतरराष्ट्रीय कंपनीने नव्हे तर, राजकोट येथील एका तरूणाने बनवली आहे. या तरूण इंजिनिअरचे नाव रिद्धिश असे आहे.

१ हजार सीसीची ही बाईक असून, फोर स्ट्रोक आहे. तसेच, इतर बाईकच्या तूलने या बाईकला चार नव्हे तर, चक्क ६ गिअर आहेत. हाईड्रोलिक क्लच, एक फुट लांबीचे दणकट ट्युबलेस टायर असणाऱ्या या बाईकची लांबी ९ फूट इतकी आहे. रिद्धिशने बाईकबद्धल अधिक माहिती देताना सांगितले की, मी नेहमीच पाहिले आहे की, आजकालचे तरूण स्टायलिश बाईकला जास्त पसंती देतात. त्यामुळे मीही विचार केला की, आपणच अशा तरूणांसाठी जरा हटके बाईक तयार करावी. हा विचार करून मी स्वस्त बसलो नाही. तर, त्यावर काम करण्यास सुरूवात केली. कित्येक महिने मी या बाईकच्या डिझाईनवर काम करत होतो. डिझाईन तयार झाल्यावर मी या बाईकच्या स्पेअर पार्ट्स बनविण्यावर लक्ष केंद्रीत केले. अशा पद्धतीने ही बाईक बनविण्यास मला ७ वर्षे लागली. इतक्या कालावधीनंतर आता कुठे माझ्या मनासारखी बाईक तयार झाली आहे.