फ्रिज खराब झाला म्हणून सुषमा स्वराज यांच्याकडे केली तक्रार

sushma-swaraj
नवी दिल्ली : असा एक किस्सा मोदी सरकारमधील परराष्ट्र मंत्री आणि सध्या ट्विटरवर जगात सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या महिला नेत्या सुषमा स्वराज यांच्यासोबत घडला की तो तुम्हाला ही पोटधरुन हसायला येईल.

लोकांच्या समस्या सोडवण्यात सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर सुषमा स्वराज या आघाडीवर असल्याचे सध्या चित्र आहे. त्यांच्याकडे अशीच एक मदत एका व्यक्तीने मागितली. पण ती थोडी विचित्रच होती. एकाने फ्रिज खराब झाल्याने त्यांच्याकडे मदत मागितली. ट्विटरवर पल्ली वेंकट नावाच्या या व्यक्तीने सुषमा स्वराज आणि रामविलास पासवान यांना ही गोष्ट ट्विट केली. एका कंपनीने त्यांना खराब फ्रिज दिला आणि ती कंपनी हा फ्रीज बदलण्यासाठी तयार नाही. यावर सुषमा स्वराज यांनी ही विनम्रतेसह खूपच छान ट्वीट केले. त्यांनी म्हटले की, भाऊ मी रेफ्रिजरेटरशी संबंधित प्रकरणात कोणतीही मदत करु शकत नाही. मी संकटग्रस्त लोकांच्या मदतीत सध्या व्यस्त आहे.

यानंतर ट्विटरवर वेंकटवर लोकांनी ट्विट करण्यास सुरुवात केली. सुषमांच्या ट्विटची अनेकांनी स्तुती केली. वेंकट यांनी ही तक्रार ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली पाहिजे होती पण त्यांनी ही तक्रार सुषमा स्वराज यांच्याकडे केली.

Leave a Comment