अन्विताने नवव्या वर्षातच डेव्हलप केले अॅपलसाठी अॅप

anvita
भारतीय वंशाची ऑस्ट्रेलियन मुलगी अन्विता विजय हिने वयाच्या नवव्या वर्षीच आयफोन व आयपॅडसाठी अॅप विकसित केले असून अॅपल डेव्हलपरच्या २०१६ च्या संमेलनात सर्वात कमी वयाची अॅप डेव्हलपर होण्याचा बहुमान पटकावला आहे. या संमेलनात अॅपलचे सीईओ टीम कुक यांची भेट घेण्याची तिची इच्छा असून टीमशी भेट हे माझे स्वप्न असल्याचे तिने सांगितले.

अन्विताने मुलांना शिकविणारे स्मार्टकिस एनिमल्स हे अॅप डेव्हलप केले असून त्यात १०० विविध प्राण्यांची नांवे व बोली भाषा शिकता येतात. तसेच रंगाविषयीची माहिती देणारे एक अॅपही तिने विकसित केले आहे व सध्या ती आणखीही एक अॅप विकसित करत आहे. त्याविषयीची माहिती मात्र जाहीर केली गेलेली नाही. अॅपलच्या स्कॉलरशीप कार्यक्रमात अन्विता या संमेलनात सहभागी होत आहे.

Leave a Comment