प्रसुतीवेळी प्रत्येक वर्षी सुमारे ५ लाख २९ हजार महिलांचा मृत्यू

who
मुंबई – दर ५ मिनिटाला एका मातेचा गर्भावस्थेत वेगवेगळ्या कारणाने मृत्यू होत असल्याचा खुलासा जागतिक आरोग्य संस्थेने (डब्ल्यूएचओ) केला असून प्रत्येक वर्षी सुमारे ५ लाख २९ हजार महिलांचा प्रसुती दरम्यान मृत्यू होता. भारतात १ लाख ३६ हजार अर्थात २५.७ टक्के महिलांचा मृत्यू होता.

मुल जन्माला आल्यानंतर जवळपास दोन तृतीअंश महिला मृत्युमुखी पडतात. प्रसुतीनंतर रक्तस्रावाची समस्या वाढते. सिजर झाल्यानंतर गर्भशय फाटल्यामुळे एक लाख महिलांमागे ८३ महिलांचा मृत्यू होतो. मातृत्व मृत्यू दर १७.७ टक्के असून नवजात मृत्यू दर ३७.५ टक्के आहे. मुल जन्माला आल्यानंतर २४ तासांच्या आत ५०० मिली लिटर किंवा १ हजार मिली लिटर रक्त निघाल्यानंतर ते पीपीएच संज्ञेत मोडते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment