भारत बिल पेमेंट सेवा जुलैत सुरू होणार

bharat-bil
नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमि. भारतात भारत बिल पेमेंट सेवा जुलैपासून सुरू करणार असल्याचे समजते. यासाठी मंडळाने ३८ बँका व ७ कंपन्यांना पेमेंट घेण्याची परवानगी दिली आहे व त्याला आरबीआयने मंजुरीही दिली आहे. यात सर्व प्रमुख बँका तसेच बिल डेस्क, टेक प्रोसेस, ऑक्सीकॅश अशा कंपन्या भारत बिल पेमेंट सेवेसाठी आऊटलेट खोलणार आहेत. या एनीटाईम, एनीवेअर सेवेअंतर्गत ग्राहक त्याची वीज, पाणी बिले, घरपट्टी, अन्य टॅक्स, विमा हप्ते, शैक्षणिक शुल्क, फोन, डीटीएच बिले, मोबाईल, क्रेडीट कार्ड बिले अशी सर्व प्रकारची बिले एकाच ठिकाणी भरू शकणार आहेत. ही बिले भरण्यासाठी क्रेडीट, डेबिट कार्ड, मोबाईल बँकींग, ऑनलाईन बँकींगचा वापर करता येणार आहे.

यासाठी ग्राहकाला प्रथम ऑनलाईन नोंदणी करून कस्टमर क्रमांक घ्यावा लागणार आहे. त्यानंतर त्याला कस्टमर आयडी नंबर दिला जाणार आहे. त्याचा वापर करून ग्राहक भारत बिल पेमेंट आऊटलेटवर किवा वेबसाईटवरही आपल्या बिलांच्या रकमा भरू शकणार आहेत.

Leave a Comment