दूर होणार कॉल ड्रॉपचे अरिष्ट

calldrop
नवी दिल्ली- मोबाईल कंपन्यांनी कॉल ड्रॉपचे अरिष्ट दूर करण्यासाठी १२ हजार कोटी रुपये गुंतवण्याची तयारी दर्शवली असून येत्या तीन महिन्यांत या रकमेतून ६० हजार टॉवर उभारले जाणार असून हा धोका कायमचा दूर करण्यात येणार आहे.

टेलिकॉम विभागात प्रमुख कंपन्यांना बोलवण्यात येऊन त्यांना सेवा सुधारण्यास बजावण्यात आले आहे. या कंपन्यांनी तसे करण्याचे वचन दिले असून त्याची माहिती टेलिकॉम सचिव दीपक यांनी दिली. टेलिकॉम क्षेत्रावर सरकारचा विश्वास आहे. सेवेचा दर्जा सुधारलाच पाहिजे आणि उद्योगाची ती जबाबदारी आहे. त्यांनी ६० हजार टॉवर उभारण्याची तयारी दर्शवली आहे आणि प्रत्येक टॉवरची किंमत २० लाख रुपये आहे.

ही गुंतवणूक येत्या तीन महिन्यांत उद्योग करेल, असे दीपक यांनी सांगितले. भारती एअरटेलचे भारतातील प्रमुख गोपाल विठ्ठल, व्होडाफोन इंडियाचे प्रमुख सुनील सूद, आयडिया सेल्युलरचे हिमांशू कपानिया आणि रिलायन्स जियोचे एमडी संजय मश्रुवाला उपस्थित होते. सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडियाचे महासंचालक राजन मॅथ्युज म्हणाले की, कॉल ड्रॉपचा प्रश्न आम्ही कशा प्रकारे सोडवणार आहोत, यावर आम्ही टेलिकॉम सचिवांशी चर्चा केली.

Leave a Comment