व्हॉटसअॅपने आणले ‘टॅग’ फिचर

whatsapp
मुंबई : आणखी एक नवीन फिचर इन्स्टंट मेसिजिंगमधील अग्रगण्य व्हॉटसअॅपने आणले असून व्हॉटसअॅपच्या या नव्या फिचरमुळे तुम्ही एखाद्या ग्रुपमधील एखाद्या व्यक्तीला ‘टॅग’ करू शकाल.

समजा एखाद्या ग्रुपमध्ये तुम्ही चॅटिंग करत आहात आणि अनेक जण त्या ग्रुपमध्ये एकाच वेळी आपले म्हणणे मांडत असतील. तर यामध्ये तुम्हाला एखाद्या व्यक्तीलाच प्रत्यूत्तर करायचे असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला मेन्शन करू शकाल. त्यामुळे, तुम्ही ग्रुपमध्ये नेमके कुणाला प्रत्यूत्तर केले आहे हे कळू शकेल. आता, ग्रुपमध्ये सध्या एकाखाली एक मॅसेज पडल्यामुळे कोण कुणाशी बोलत आहे हेच कळत नसल्यामुळे कधी कधी अडचण तर होतेच पण कधी-कधीतर पंचाईत देखील होते.

हे फिचर कसे वापराल –
– तुम्हाला ग्रुप चॅटिंगमध्ये ज्या व्यक्तीला प्रत्यूत्तर द्यायचे असेल त्या मॅसेजवर काही सेकंद होल्ड करून ठेवा.
– आता अॅपच्या वरच्या बाजुला तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील. त्यामध्ये रिप्लायच्या आयकॉनवर टॅप करा. टॅप केल्यानंतर हा मॅसेज सिलेक्ट झाला असेल.
– आता टायपिंग विंडोमध्ये किबोर्डच्या वर मॅसेज तुम्हाला करड्या रंगाचा बॉक्स दिसेल. याच्या खाली तुम्ही तुमचे उत्तर टाईप करू शकाल.
– उत्तर टाईप केल्यानंतर उजव्या बाजुला दिसणारे सेन्ड बटन टॅप करा. त्यानंतर हा मॅसेज तुम्ही कुणाला उत्तर दिले आहे ते दर्शवेल. सध्या व्हॉटसअॅपची ही सुविधा बीटा व्हर्जनमध्ये दिसत असून लवकरच अँन्ड्रॉईड आणि आयओएस यूजर्ससाठी ही सुविधा सुरू होईल.

Leave a Comment