जिओ ९० दिवसांसाठी देणार मोफत ४जी इंटरनेट आणि व्हॉईस कॉलिंग

reliance-jio
नवी दिल्ली: ४जी सर्व्हिसच्या कमर्शिअल लॉन्चआधीच रिलायंस जिओने ग्राहकांसाठी फ्रि ट्रायल ठेवले असून ग्राहकांना त्यानुसार ९० दिवसांसाठी मोफत अनलिमिटेड ४जी डेटा दिला जाणार आहे. ९० दिवसांच्या कालावधीत ग्राहक त्यांना हवा तितका डेटा वापरू शकतात. या सिमकार्डवर तीन महिन्यांसाठी फ्रिमध्ये अनलिमिटेड ४जी डेटा आणि ४५०० मिनिटाचे व्हॉईस कॉल दिले जाणार आहेत.

त्यासोबतच अनलिमिटेड कॉलींग आणि मॅसेजिंगची सुविधाही देण्यात येणार आहे. गेल्यावर्षी रिलायंस जिओने ४जी सेवा त्यांच्या कर्मचा-यांसाठी सुरू केली होती. ही सेवा मिळवण्यासाठी काही अटी होत्या. त्या पुर्ण केल्यास ग्राहकांना ३ महिने फ्रि ४जी डेटा आणि अन्यही सुविधा मिळणार होत्या.

लाईफचा स्मार्टफोन या ऑफरसाठी विकत घ्यावा लागेल. ऑफरसाठी ग्राहकांना www.jio.com वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर कंपनीकडून एक ईमेल येईल. त्या मेलमध्ये सेवेची सर्व माहिती असेल. त्यासोबतच एक बारकोडही असेल ज्याला फोनमध्ये सेव्ह करावे लागेल. त्यानंतर रिलायंस लाईफ स्टोर किंवा रिलायंस डिजिटल स्टोरमध्ये जाऊन ते दाखवावे लागेल. त्यानंतर येथे लाईफचा फोन खरेदी केल्यावर जेव्हा तुम्ही बारकोड दाखवाल तेव्हा रिटेलर तुम्हाला रिलायंसचे एक फ्रि सिमकार्ड देतील. त्यानंतर सिमचे व्हेरिपिकेशन केले जाईल. सिमचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही फ्रि ४जी डेटाचा वापर करू शकाल.

Leave a Comment