पॅनासोनिकचे स्वस्त स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल

panasonic
नवी दिल्ली – टी४४ आणि टी३० हे नविन दोन स्मार्टफोन पॅनासोनिक इंडीयाने भारतीय बाजारात आणले असून त्यांचे बाजारमुल्य अनुक्रमे ४,२९० आणि ३,२९० एवढे आहे.

भारतीय बाजारपेठेच्या दृष्टीने ग्राहकासाठी उच्च उत्पादकता, कार्यक्षमता, मनोरंजन, बहूपर्यायी आणि चांगले कनेक्टिव्हिटी असलेले टी४४ आणि टी३० हे स्मार्टफोन कंपनीने उपलब्ध करून दिले आहेत. आम्ही ग्राहकांना परवडेल अशा किंमतीला एक परिपूर्ण स्मार्टफोन देण्याचा उद्देश ठेऊन हे मॅाडल बाजारात आणले आहेत, असे पॅनासोनिकचे व्यवसाय प्रमुख पंकज राणा यांनी सांगितले.

कसे आहे हे स्मार्टफोन –
याची स्क्रीन ४ इंचाची WVGA असून यात अॅन्डॉइड ५.१ लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम आणि १.३ GHzचा क्वाडकोर प्रोसेसर त्याचबरोबर LED फ्लॅशसह ५ मेगापिक्सेलचा रिअर आणि २ मेगापिक्सेलचा फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन ड्यूअल सीम आणि ३जी सपोर्टेड आहे. टी३० स्मार्टफोन हा अॅड्रायड लॉलीपॉप ५.१ या ऑपरेटीग सिस्टीमवर चालतो, तसेच ५१२ एमबी रॅम, ४ जीबी इटरनल मेमरी एक्सान्डेबल ३२ जीबी, १,४०० MAh बॅटरीसह उपलब्ध आहे. तर टी४४ हा स्मार्टफोन १ जीबी रॅम, ८ जीबी इटरनल मेमरी एक्सान्डेबल ३२ जीबी, २,४०० MAh बॅटरीसह रोज गोल्ड, चमकदार सोनेरी अशा रंगात उपलब्ध आहे.

Leave a Comment