तीन रुपयांनी महागणार पेट्रोल

petrol
नवी दिल्ली- कच्च्या तेलाच्या किमती सध्या प्रतिबॅरल ५२.५० डॉलर इतक्या वाढल्या असून तेलाच्या किमती मे महिन्यात दोन डॉलरने वाढल्या तेव्हा पेट्रोल ३.४१ पैशांनी वाढले होते.

तेलाच्या किमती गेल्या आठ दिवसांतच २ डॉलरने वाढल्या असून याचा परिणाम म्हणजे १५ जूनला तेल कंपन्यांची बैठक होणार असून त्यात पेट्रोलचा दर ३ रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. कच्चे तेल महाग झाल्यावर सरकारकडे दोनच पर्याय आहेत. एक तर सरकार अबकारी शुल्क कमी करू शकते अथवा पेट्रोल -डिझेलचे दर वाढवू शकते. सध्या पेट्रोलवर अबकारी शुल्क प्रति लिटर २१ रु. ४८ पैसे आहे.

Leave a Comment