अमेरिकन शिक्षकांची केरळमध्ये स्काईपवर शाळा

skype
विशाखापट्टणमः अमेरिका आणि कॅनडा येथील अनिवासी भारतीय शिक्षकांकडून केरळच्या गोदावरी जिल्ह्यातील चिंतलापुडी येथील शाळेतील विद्यार्थी व्हिडिओ चाटींगद्वारे शिक्षण घेत आहेत.

या शाळेचे नाव एपी सोशल वेलफेअर स्कूल असे असून या शाळेत एकूण ३२० विद्यार्थी असून ही शाळा अनुसुचित जाती जमाती कल्याण विभागामार्फत चालविली जाते, अशी बातमी एका इंग्रजी दैनिकाने दिली आहे. सरकारी शाळांसह खाजगी शाळांसाठी ही शाळा आदर्श उदाहरण बनले आहे.

या शाळेमध्ये दर रविवारी दोन तास स्काईपद्वारे अमेरिका आणि कॅनडा येथील इंजीनिअर्स, डॉक्टर आणि पीएचडी धारक शिक्षकांसोबत विद्यार्थी संवाद साधतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचे आवडीने निरसन करतात. तसेच विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचे काम करतात. आतापर्यंत स्काईपद्वारे १२ वर्ग भरवण्यात आल्याचे या शाळेचे मुख्याध्यापक राजा राव यांनी सांगितले आहे.

एका ड्रीम प्रोजेक्ट अंतर्गत एपी सोशल वेलफेअर स्कूल ही शाळा सुरु करण्यात आली आहे. जानकारांच्या मदतीने अमेरिका आणि कॅनडा येथील अनिवासी भारतीयांशी संपर्क करण्यात आला. त्यांनी होकार दिल्यानंतर अनुसुचित जाती जमाती कल्याण मंत्री व्ही. रामुलू यांची परवानगी घेण्यात आली. रामुलू यांनी प्रस्ताव मांडताच तत्काळ होकार दिला. सोबतच सर्व साहित्य घेण्यासाठी निधी देखील उपलब्ध करुन दिला, असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.

Leave a Comment