योग, आयुर्वेद प्रसारासाठी केंद्राची मोठी योजना

ayurved
ट्रान्सफॉर्म इंडिया या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, होमिओपथी, युनानी उपचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार जिल्हा व प्राथमिक आरोग्य केंद्रात देशातील गावागावात तयारी सुरू झाली असून या भागातील सर्व सरकारी रूग्णालये या प्रकारच्या उपचारांसाठी सज्ज केली जात असल्याचे समजते.

जिल्हा व प्राथमिक आरोग्य केंद्रे व सरकारी रूग्णालये लिंक करून तेथे सर्वत्र आयुर्वेद, युनानी, नॅचरोपथी व होमिओपथी उपचार सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्याचबरोबर आयुष मंत्रालयाची आयुष कीटही वितरीत केली जाणार आहेत. ही कीट वापरण्याचे प्रशिक्षण आशा कार्यकर्त्यांना दिले जात असल्याचेही समजते. याचबरेाबर सरकार नॅशनल हेल्थ येाजना डिसेंबर २०१६ पासून लागू करत आहे. रूग्णांना स्वस्त औषधे मिळावीत यासाठी मार्च २०१७ पर्यंत किमान १ हजार जनऔषधी स्टोअर्सही सुरू केली जात आहेत. सध्या अशा प्रकारची १०० स्टोअर्स सुरू झाली आहेत.

Leave a Comment