या व्यक्तीच्या ट्विटमुळे सॅमसंगला अरबोचा फटका

tesla-motors
प्रिटोरिया – काल पर्यंत सोशल मीडियात सॅमसंग ही कंपनी इलेक्ट्रॉनिक गाड्यांच्या बॅटरीच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करत आहे अशी चर्चा होती. त्याचबरोबर या बॅटरी सॅमसंग टेसला मोटर्ससाठी बनवत असल्याची अफवा पसरली होती. पण या अफवेवर टेसला मोटर्सचे सीईओ एलोन मस्क यांनी ट्विट करत पडदा टाकला आहे. मस्क यांच्या ट्विटमुळे सॅमसंग एसडीआयला तगड्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. सॅमसंगच्या शेअरमध्ये ८ टक्क्यांची घसरण झाली आणि कंपनीला ३८.१८ अरब रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.

टेसला मोटर्स आपल्या इलेक्ट्रॉनिक गाड्यांमध्ये फार पूर्वीपासून पॅनासोनिक कंपनीच्या बॅटरी वापरत आहे आणि आपल्या गीगा कारखान्यासाठी याच पॅनासोनिकसोबत भागीदारी करत आहे. मस्क यांच्या ट्विटनंतर सॅमसंगच्या शेअरमध्ये घसरण तर पॅनासोनिकच्या निर्देशांकात ३ टक्क्यांची वाढ झाली .

Leave a Comment