या चित्रात नेमके काय दडले आहे ?

painting
नवी दिल्ली – वर दिलेल्या चित्राला लक्षपूर्वक पहा आणि खरे सांगा यात तुम्हाला काही चित्रविचित्र दिसत आहे का? पुन्हा-पुन्हा पहा पण लक्षपूर्वक पहा तुम्हाला लांडग्याच्या या चित्रात तुम्हाला कोणी मुली दिसत आहेत का? जर तुम्ही शोधू शकलात तर तुम्हाला यात एक नाही दोन नाही चक्क तीन मुली या चित्रात आढळतील.

या विचित्रपणामुळेच या चित्र सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहे. दरम्यान हे चित्र इटालियन कलाकार जोहानेस स्टॉयटर (Johannes Stoetter) यांची जिवंत कलाकृतिची (moving installation) जाण करून देणारे आहे. ज्यासाठी त्यांनी तीन निर्वस्त्र मुलींच्या शरीरावर पेंट करून त्यांना अशा प्रकारे बसवले कि त्या एखाद्या लांडग्याप्रमाणे दिसतील. हा व्हिडीओ ५ जूनला अपलोड केला गेला आहे आणि त्यांच्या या जिवंत कलाकृतीला ४ लाखापेक्षा जास्तवेळ पाहिले गेले आहे.

दरम्यान जोहानेस स्टॉयटर यांनी यापूर्वी देखील आपल्या अद्भूत कलाकृती लोकांसमोर आणल्या असून याबाबत जगभरातून त्यांचे कौतुक देखील झाले आहे. त्यांच्या अशाच काही कलाकृती फक्त माझा पेपरच्या वाचकांसाठी….

Leave a Comment