फ्लाईट रद्द झाल्यास १० हजार रूपयांपर्यंत भरपाई

airport
मुंबई : फ्लाईट रद्द झाल्यास प्रवाशांना १० हजार रूपयांपर्यंत भरपाई देण्याची घोषणा आज केंद्रीय वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी यांनी केली आहे.

ट्रॅव्हल एजंट किंवा ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून बुकिंग केले असेल तरीही १५ दिवसांत प्रवाशांना रिफंड देणे विमान कंपन्यांसाठी अनिवार्य असून त्याचबरोबर प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी त्यांनी काही घोषणा आज केल्या आहेत.

१. १५ किलोच्या वर सामान (बॅगेज) झाल्यास पुढील ५ किलोपर्यंत प्रतिकिलो १०० रुपयांहून जास्त रक्कम आकारता येणार नाही.
२. अपंग प्रवाशांसाठी असलेल्या सेवांमध्ये सुधारणा करणार
३. उड्डाणाच्या २४ तासाहून कमी कालावधीत फ्लाईट रद्द झाल्याची घोषणा झाल्यास १० हजार रुपयांपर्यंत भरपाई देण्याची तरतूद
४. ओव्हरबुकिंगमुळे प्रवाशांना विमानात प्रवेश नाकारल्यास २० हजार रुपयांपर्यंत भरपाई देण्याची तरतूद
५. कॅन्सलेशन फी बेसिक फेअरपेक्षा अधिक असू शकत नाही. रिफंड प्रोसेससाठी अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही.
६. प्रोमो आणि स्पेशल ऑफर असलेल्या विमानांनाही रिफंड लागू होणार.
७. रिफंड कॅशमध्ये घ्यावं की रक्कम क्रेडिट करावी, हा निर्णय सर्वस्वी प्रवाशांचा असेल.
८. ट्रॅव्हल एजंट किंवा ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून बुकिंग केले असेल तरीही १५ दिवसांत प्रवाशांना रिफंड देणे विमान कंपन्यांसाठी अनिवार्य आहे.

Leave a Comment