नागपूरात जन्मले ‘जेनेटिक डिसऑर्डर’ बाळ

baby
नागपूर – शुक्रवारी रात्री एका महिलेने शहरातील लता मंगेशकर रुग्णालयात ‘जेनेटिक डिसऑर्डर’ असलेल्या एका ‘हर्लेक्विन’ बाळाला जन्म दिला असून ८ महिने वाढ झालेले हे बाळ असून त्याच्यावर डॉक्टर यश बानाइत आणि चमु उपचार करत आहेत.
baby1
‘हर्लेक्विन’ हा एक गंभीर जेनेटिक डिसऑर्डर असून असे एखादेच बाळ ३ लाखांमध्ये जन्माला येते. व्यक्तीच्या त्वचेवर या डिसऑर्डरमुळे परिणाम होतो. असा डिसऑर्डर असलेल्या नवजात बालकांच्या शरीरावर अतिशय कडक त्वचेचे आवरण असते. अशा मुलांच्या त्वचेची सातत्याने खूप काळजी घेणे गरजेचे असते. दरम्यान हे बाळ किती दिवस, किती महीने वा आणखी किती काळ जगेल हे सांगता येणार नाही. यापूर्वी पाकिस्तानमध्ये अशा प्रकारचे बाळ जन्माला आले होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment