‘टोयोटा’तील कर्मचारी करणार घरी बसून काम !

toyota
टोकियो – जपानस्थित एक कंपनी कर्मचाऱ्यांना घर आणि कार्यालयीन कामकाज यांचे योग्य संतुलन साधता यावे यासाठी “वर्क फ्रॉम होम‘ ही योजना राबविण्याबाबत गांभीर्याने विचार करत असून असा निर्णय जर या कंपनीने घेतला तर नोकरदारांसाठी घरात बसून काम करण्याची अनोखी संधी उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे.

असा निर्णय घेण्याच्या विचारात जपानस्थित “टोयोटा‘ ही वाहननिर्मिती करणारी कंपनी असून कर्मचाऱ्यांना घरात बसून कार्यालयातील कामकाज करता यावे यासाठी “टेलिकम्युट‘ प्रणालीचा वापर करण्यात येण्याची शक्‍यता आहे. ‘टोयोटो’मधील किमान २५ हजार कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची संधी देण्याचा कंपनी विचार करत आहे. या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ऑगस्टपासून हा निर्णय कार्यान्वित करण्यात येणार आहे. नजीकच्या भविष्यात कंपनीकडून ७२ हजार कर्मचाऱ्यांना या संधीचा फायदा देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्याला त्याच्या कुटुंबाला आणि पाल्यांना अधिक वेळ देता येणे शक्‍य होणार आहे. शिवाय महिलांना लग्न झाल्यानंतर, गरोदर किंवा बाळंतपणाच्या काळात काम सोडण्याची आवश्‍यकता पडणार नाही. शिवाय कर्मचाऱ्यांला वृद्ध आईवडिलांच्या सेवेसाठीही काम सोडावे लागणार नाही.

Leave a Comment