गुगलच्या स्ट्रीट व्ह्यू अॅपला भारताचा नकार

street
भारतीय शहरे, गांवे, नद्या, पर्वतरांगा, पर्यटनस्थळे स्ट्रीट व्ह्यू अॅपमध्ये बंदिस्त करण्याच्या गुगलच्या प्रस्तावास केंद्रीय गृहमंत्रालयाने नकार दिला आहे. गुगलने त्यांच्या या अॅपच्या माध्यमातून भारत कव्हर करण्याची परवानगी केंद्राकडे मागितली होती. त्यामुळे भारतातील पाहण्यायोग्य सारे कांही पर्यटकांना अथवा अन्य लोकानाही घरबसल्या न्याहाळणे शक्य होणार होते. मात्र भारतीय सुरक्षा संस्थांनी ही योजना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असल्याचे अहवाल केंद्राला दिले होते. त्यानुसार गृहमंत्रालयाने या योजनेला नकार दिला असे समजते.

मुंबई २६/११ हल्ल्याच्या वेळी पाक अमेरिकन डेव्हीड हेडली याने याचप्रकारे मुंबईतील हल्ला करण्यासाठीच्या जागांचे फोटो काढले होते व त्यावरूनच हल्ल्याची योजना आखली होती हे तपासात उघड झाल्यानंतर गुप्तचर यंत्रणा सावध झाल्या आहेत. गुगलच्या या अॅपचा वापर भारतातील संवेदनशील स्थळांसाठी धोक्याचा ठरू शकतो हे लक्षात घेऊन या संस्थांनी सरकारला अशी कोणतीही परवानगी देणे म्हणजे भारतावर दहशतवादी हल्ल्याचे संकट ओढवून घेण्यासारखे असल्याचा इशारा दिला आहे.

Leave a Comment