स्मार्ट सिटीपाठोपाठ केंद्राने स्मार्ट स्टार्टअप व्हिलेज बनविण्याची योजना तयार केली असून पुढील वर्षाच्या सुरवातीला ती कार्यान्वित करण्यात येत असल्याचे समजते. २०१८ मार्च पर्यंत अशी १०० स्मार्ट व्हिलेजेस उभारली जाणार आहेत.
स्मार्ट स्टार्टअप व्हिलेज योजना तयार
या योजनेनुसार देशाच्या छोट्या गावांत नवीन उद्योग व्यवसाय संधी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे गांव पातळीवरच रोजगार निर्मिती होऊ शकणार आहे त्याचबरोबर गावांचा विकासही होऊ शकणार आहे. या संदर्भात नवीन उद्योग सुरू क रू इच्छीणार्या उद्योजक व्यावसायिकांकडून सूचना मागविल्या गेल्या आहेत. त्याच्या आधाराने स्टार्टअप व्हिलेज बनविली जातील. या कंपन्यांना सरकार अर्थसहाय्य करणार आहे तसेच करसवलती देणार आहे. मात्र गाव विकास आणि व्यवसाय वातावरण निर्मिती करणे तसेच स्थानिकांना रोजगार देण्याची जबाबदारी या कंपन्यांना घ्यावी लागणार आहे.