रमजान पाळण्यात येथील नागरिकांची होतेय अडचण

ramjan
जगभरात सध्या मुस्लीमांचा पवित्र महिना रमजान सुरू असून त्यानिमित्ताने रोजे पाळले जात आहेत. मात्र स्वीडनमधील किरूना शहरातील मुस्लीम नागरिकांना रोजे पाळण्यात मोठीच अडचण येत आहे. कारण येथे या दिवसांत सूर्य मावळत नाही. त्यामुळे रोजा कधी सोडायचा असा प्रश्न येथील नागरिकांना येत आहे.

रमजानचे रोजे पाळताना प्रामुख्याने सहरी व इफ्तारच्या वेळा काटेखोरपणे पाळल्या जातात. सहरी म्हणजे सूर्योदयापूर्वी घेण्याचे भोजन तर इफ्तार म्हणजे सूर्यास्तानंतर करावयाच्या भोजनाची वेळ. सूर्योदय व सूर्यास्तानुसार या वेळा ठरत असतात. मात्र अंटार्कटिक सर्कल मध्ये असलेल्या स्वीडनमधील किरूना येथे २७ मे १६ जुलै या काळात सूर्य मावळतच नाही. या भागात अनेक मुस्लीम रोजे ठेवतात व त्यात शरणार्थी मुस्लीमांची संख्या मोठी आहे. या भागात अर्ध्या रात्रीही सूर्य दिसतो व चंद्राचे दर्शन बहुतेकवेळा होतच नाही.

यावर युरोपियन कौन्सिल फॉर फतवा अॅन्ड रिसर्च संस्थेने किरूना गावातील मुस्लीमांनी स्टॉकहोमची वेळ सहरी आणि इफ्तारसाठी पाळावी असे आदेश दिले आहेत. किरूना येथे यंदाच्या वर्षी ११ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात सूर्य दिसणार नाही तर त्या काळात येथे पूर्ण अंधाराचे साम्राज्य असेल.

Leave a Comment