अस्थमावर नियंत्रण मिळविणाऱ्या नवीन उपकरणाचा शोध

asthma
वॉशिंग्टन : अमेरिकेत संशोधन करून अस्थमा रोखण्यासाठी उपयुक्त अशा उपकरणाचा शोध लावण्यात मूळच्या भारतीय संशोधकांनी यश मिळविले आहे. व्यक्तीच्या शरीरातील रक्तदाब, हृदयाचे ठोके, या घटकांवर नियंत्रण ठेवून अस्थमाचा धोका टाळण्यास हे उपकरण मदत करेल, असा संशोधकांना विश्‍वास आहे. या उपकरणाला आरोग्य आणि पर्यावरण ट्रेकर (एचईटी) असे नाव देण्यात आले आहे. अस्थमाचे रुग्ण सध्या श्‍वसन पंप (इनहॅलर्स) या उपकरणावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. मात्र, अस्थमाचा सामना करण्यास हे उपकरण अतिशय कमकुवत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

अस्थमाचा सामना करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले हे उपकरण शरीरावर बसविता यावे यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे अस्थमा रोखण्यास आणखी मदत होणार आहे. अस्थमाचा शरीरावर होणार प्रभाव रोखण्यासाठी हे उपकरण प्रभावी ठरेल, असे उत्तर कॅरोलिना विद्यापीठातील संशोधक अल्पेर बोझकुर्त यांनी सांगितले. व्यायाम करण्याच्या वेळेत या उपकरणाचा वापर केला तरी ते प्रभावी ठरेल, असे संशोधक जेम्स डिफेंडरफर यांनी सांगितले. रक्तवाहिन्यांतील संवेदना जाणणा-या या उपकरणाचा एक भाग घडाळ्याप्रमाणे हातात घालता येईल आणि दुसरा भाग छातीवर लावणे आवश्यक आहे.

छातीवरील उपकरण रुग्णाच्या हालचाली, हृदयाचे ठोके, श्‍वसन क्रिया, रक्तातील ऑक्सिजन आणि फुप्फुसाची क्रिया यांचा पाठपुरावा करेल, असे संशोधकांनी सांगितले. तर हातात घातलेले उपकरण हवेतील पर्यावरणातील नोंदी घेणार आहे. हवेतील घटक, ओझोनचे प्रमाण, तापमान आणि आद्रर्‌रतेचा अस्थमा रुग्णावर होणारा परिणाम तपासण्यास यामुळे मदत होणार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment