साध्या सोप्या आहार बदलाने राखा त्वचा व केसांचे आरोग्य

skin
बाहेर कुठेही वावरताना आपले लूक्स व आपण कसे दिसतो हे फार महत्त्वाचे असते. आपले दिसणे अनेक संधी उपलब्ध करण्यासाठी हातभार लावत असते तसेच कांही संधी त्यामुळे हुकण्याचीही शक्यता असतेच. यामुळेच सुंदर त्वचा आणि सुंदर केस यावर लोक पैसा व वेळ दोन्हीही भरपूर प्रमाणात खर्च करत असतात. मात्र असा वेळ व पैसा खर्च न करता आहारातील साध्या सोप्या बदलानेही ग्लोईंग स्कीन आणि चमकदार केस मिळविता येतात. तीही कांही सुपरफूडच्या सहाय्याने. कसे ते पाहू.

१) डार्क चॉकलेट- चॉकलेट न आवडणारी व्यक्ती फारच विरळा असेल. त्यामुळे चॉकलेट खाण्यात कुणालाच कांही अडचण असेल असे वाटत नाही शिवाय हा पदार्थ अगदी आनंदाने खाण्याची मजाही लुटता येणार ते वेगळे. डार्क चॉकलेटमध्ये फ्लॅवलाईडड नावाचे अँटी एजिंग म्हणजे वृद्धत्व दूर राखणारे संयुग असते. हे संयुग सूर्यप्रकाशातील यूव्ही किरणांपासून त्वचेचे संरक्षण करतेच पण त्वचेवर सुरकुत्या, बारीक रेघा, डाग येण्यासही प्रतिबंध करते. ते केसांसाठीही उपयुक्त आहे. कारण केसांखालच्या त्वचेचे रक्ताभिसरण यामुळे सुधारते व त्यामुळे केस चमकदार व निरोगी दिसतात त्याचबरोबर त्वचेचे इन्फेक्शन होण्यापासूनही ते आपला बचाव करते.

२)पालक- बारमाही मिळणारा हिरवागार पालक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. भाजी, सूप, पराठा, सॅलड अशा विविध पदार्थांत तो वापरता येतो. पालकात बीटा कॅरोटिन, बी, सी, ई जीवनसत्वे, शिवाय पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न, मॅगेनीझ ओमेगा थ्री फॅटी अॅसिड असते. यामुळे वाढत्या वयाचे परिणाम त्वचेवर कमी दिसतात त्याचबरोबर डेड स्कीनचे प्रमाणही कमी होते. सुरकुत्या कमी होतात व त्वचा मऊ मुलायम बनते. फॅटी अॅसिडस केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

skin1
३)दही- दह्यात चांगले बॅक्टेरिया, बी,सी,ई जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे वर्षभर दही खाल्ले तरी त्याचे अनेक चांगले परिणाम दिसतात. मुरूम पुटकुळ्यांना दह्याचे नियमित सेवन अटकाव करते. त्वचेवरील डाग कमी करते. तसेच त्वचा ओलसर राखण्यासही मदत करते. केसांसाठीही दही उपयुक्त आहे कारण ते केसांखालची त्वचा ओलसर ठेवते व त्यामुळे केस गळण्याचे प्रमाण कमी होते.

४)अक्रोड- वास्तविक पाहता सर्वच सुकामेवा आरोग्यासाठी खूपच लाभदायक असतो. पण त्यातही अक्रोड त्वचा व केसांसाठी सुपरफूड म्हणता येईल. त्यात ओमेगा थ्री फॅटी अॅसिड विपुल प्रमाणात असते व त्यामुळे त्वचा हेल्दी राहते. उन्हाळ्यातही त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही व तिचे आरोग्य राखले जाते. केसांना अक्रोड सेवन चमकदार बनविते.

५)नारळ- नारळाचे पाणी पोटॅशियमचे भंाडार म्हणता येईल. यामुळे त्वचेचा ओलसरपणा टिकून राहण्यास मदत मिळते व त्वचा ग्लो होते. हे त्वचेसाठी कायमचे नॅचरल मॉइश्चरायझर आहे. त्यात ई, के व अन्य जीवनसत्वे व अनेक क्षार असतात. यामुळे केस घनदाट, चमकदार बनतात.

1 thought on “साध्या सोप्या आहार बदलाने राखा त्वचा व केसांचे आरोग्य”

  1. मी पण गृहिणी आहे मला एखादा उद्योग सुरू करायचा आहे मला सल्ला द्यावा

Leave a Comment