विप्रो होम्स टूलमुळे ३ हजार अभियंत्यांच्या नोकरीवर गदा

wipro
विप्रो होम्स या आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूलमुळे कंपनीतील किमान ३ हजार सॉफ्टवेअर अभियंत्यांच्या नोकरीवर गदा आली असल्याचे समजते. हे टूल विप्रो त्यांच्या कांही प्रकल्पात वापरणार आहे. तीन हजार अभियंत्यांची गरज असलेले सॉफटवेअर मेंटेनन्सचे काम हे टूल एकटेच पार पाडू शकणार आहे.

विप्रोतील अधिकारी या संदर्भात म्हणाले की आम्ही १३०० इंजिनिअर्सना ऑन साईटवरून तसेच किमान २००० इंजिनिअर्सना ऑफ साईटवरून हटवितो आहोत. होम्स टूलमुळे कंपनीला ४६.५ दशलक्ष डॉलर्स वाचविता येणार आहेत. हे टूल बाहेरील कांही कंपन्यांनाही विकले जाणार आहे व त्यातून विप्रोला ६० ते ७० दशलक्ष डॉलर्स मिळू शकणार आहेत. यापूर्वी अशाच टूलचा वापर टीसीएस व इन्फोसिस या कंपन्यांनीही सुरू केला आहे.

Leave a Comment