लेईकोचे एलई टू व एलई मॅकस टू आले

leeco
लेइेकोने बुधवारी त्यांच्या स्मार्टफोन सेकंड जनरेशनमधील दोन नवीन फोन लाँच केले आहेत. पैकी एलई मॅक्स टू साठी ६ जीबी रॅम तर एलई टूसाठी ३ जीबी रॅम दिली गेली आहे. हे दोन्ही फोन्स अँड्राईड ६.० मार्शमेलोवर आधारित यूआय ५.६.०१ ओएस वर रन होणार आहेत. दिल्लीत झालेल्या या इव्हेंटमध्ये कंपनीने हेडफोन्सची नवी रेंज तसेच ई कॉमर्स पोर्टल एलई मॉल डॉट कॉम हेही लाँच केले आहेत. कंपनीने यावेळी निवडक २०० ग्राहकांना एलई टू फोन केवळ १ रूपयांत देण्याची ऑफरही जाहीर केली आहे.

एलई मॅक्स टू दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. त्यात एकाला चार जीबी रॅम व ३२ जीबी इंटरनल मेमरी तर दुसरा ६ जीबी रॅम व ६४ जीबी मेमरीचा आहे. या दोन्ही फोनसाठी ५ इंची क्यूएचडी सुपर रेटिना डिस्प्ले, २१ एमपीचा बॅक तर ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. लई टूसाठी ५ इंची एचडी डिस्प्ले, ३जीबी रॅम ३२ जीबी इंटरनल मेमरी, १६ एमपीचा बॅक तर ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. हे फोन फोरजी, एलटीई, व्होल्ट कनेक्टीव्हीटीला सपोर्ट करतात. एलई टूची किंमत ११९९९ रूपये आहे. एलई मॅक्स टू च्या ३२ जीबी साठी २२९९९ तर ६४ जीबी साठी २९९९९ रूपये मोजावे लागणार आहेत. हे फोन्स फ्लिपकार्ट बरोबरच कंपनीच्या एलई मॉल डॉट कॉम ई कॉमर्सवरही मिळू शकणार आहेत.

Leave a Comment