फक्त ७ दिवसात आता मिळणार पासपोर्ट

passport
नवी दिल्ली : आता नागरिकांना पासपोर्ट बनवण्यासाठी लागणाऱ्या वेळापासून मुक्ती मिळणार असून फक्त सात दिवसांमध्ये आता तुम्हाला पासपोर्ट मिळू शकतो. तुमच्याकडे यासाठी आधार कार्ड, वोटर आयडी आणि पॅन कार्ड असणे गरजेचे असून त्याचबरोबरच तुमच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे प्रतिज्ञापत्र देणेही बंधनकारक असणार आहे. एकूण ९८ लाख ८० हजार पासपोर्ट २०१४या वर्षामध्ये देण्यात आले. देशामध्ये एकूण ३७ पासपोर्ट सेवा केंद्र आहेत. या पासपोर्ट सेवा केंद्रामधून सरकारला वर्षाला २ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तचा फायदा होतो.

Leave a Comment